STORYMIRROR

Nutan Pattil

Comedy

3  

Nutan Pattil

Comedy

भाजीवाली गंगुबाई

भाजीवाली गंगुबाई

1 min
210

आली आली गंगुबाई

घेऊन ताजी भाजी

तुरुतुरु कशी चाले

जशी दिसते आजी


अशी ओरडते गंगू

कांदे बटाटे आले!!

घ्या बयांनो लवकर

घामाघूम मी झाले!!


बसली फथकल घालून

गंगू बदकन जमिनीवर

भाव बोलू लागली

चढवले सर्व डोक्यावर!!


भाजी घ्या भाजी

लई लई झकास!!

बायको होईल खुश

जेवण देईल खास!!


गोड गोड बोलून

गंगू भाजी विकी!!

उद्या अजून येईन

सोबत घेऊन चिक्की!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy