STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

कामसू मुंगीबाई

कामसू मुंगीबाई

1 min
233

मुंगीबाई मुंगीबाई

किती करता घाई घाई,

सारखी आपली धावपळ

इकडून तिकडे पळापळ


होता का जरा शांत

बसा थोड्या निवांत,

लगबग लगबग सारखी कसली

बरी नाही घाई असली


मुंगी बाई बोलू लागली

पावसाळ्याची काम सगळी,

खाऊ आता संपला आहे

वारुळाला भेगा पडल्या आहेत


पाऊस सुरु आता होईल

मग कामाची घाई होईल,

त्रेधा तिरपीट उडेल माझी

म्हणून आता घाई कामाची


भेगा सगळ्या बुजवून घेईन

खाऊ जास्त साठवून घेईन,

त्याशिवाय कसलं निवांत

अशी कशी बसू शांत


मुंग्या आम्ही दूरदर्शी

उद्याचा सतत विचार मनाशी,

कामसूपणा आमच्या ठायी

म्हणून कामाची सतत घाई


मुंगी बाई ठरली हुशार

मला पटले तिचे विचार,

चुकीचेच आहे असे वागणे

तहान लागल्यावर विहीर खोदणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy