Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Vaidya

Inspirational

4.3  

Sandhya Vaidya

Inspirational

सुर्य प्रकाश

सुर्य प्रकाश

1 min
373


डळमळीत नौका आमची

पैलतीरावर पोचलो सारे

सुर्या तुझ्याच प्रकाशाने

उघडलीत खिडकी दारे...1


गाळसाळ समजून आम्हा

ढकलले खोल खोल दरीत 

तुझ्या प्रज्ञेचा वा-यासवे

उचलले गेलो सारे त्वरित ..2


तो प्रकाशाचा तीव्र मारा

जातीयता जाळत गेला

तु सुर्य झालास म्हणून 

अंधाराचा विनाश झाला..3


भग्न झाल्या सा-या बेड्या

विणलीस शृंखला समतेची

बंधुत्वाची बांधून शिदोरी

रचली गाथा संविधानाची..4


सुर्या तुझ्या किरणांपासून 

कित्येक शिकले जगायला

आरोळीसवे तुझ्या बाबा

मुके ते लागले बोलायला...5


दिलास सुर्य प्रकाश आम्हा

मिणमिणते बनलोत दिवे

अजुनही भिववितात आम्हा

 काही परप्रकाशित काजवे...6



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational