सुरक्षा
सुरक्षा
सुरक्षा
खरंच आई करशील
का ग माझी सुरक्षा?
तरच आण मला जगात ||धृ||
मुलगी नको म्हणून
करतायत भ्रूणहत्या
पण येऊनही जगात
करतायत अब्रूची हत्या ||१||
आहे का ग मान
या जगात मला
अब्रूची सुरक्षा
देशील का ग मला?||२||
म्हणतात मुलगी आहे
वंशाची माझ्या पणती
पण तीच झाली मोठी
की जीवाला घोर किती||३||
नकोत ग मला त्या
साऱ्या वखवखलेल्या नजरा
देहावरून फिरत फिरत
हातात देतात गजरा||४||
खरच ग आई
त्यापेक्षा एकच कर
मला आपलं तुझ्या
उदरातच दे मरण||५||
