सुपर पाॅवर
सुपर पाॅवर
नव सृजनसे महाशक्ती
निसर्गाने निर्माण केलेली,
वाढते गर्भातच निर्धास्त
पिढ्यानुपिढ्या आलेली... १.
सुवर्णाक्षराने लिहिलेली
पाने आपुली इतिहासाची,
जिजाऊ,अहिल्या बाणेदार
रमाई, सावित्री गंगोत्री शिक्षणाची... २.
विज्ञान,तंत्रज्ञान,तत्वज्ञानात
जीवनात सर्वच क्षेत्री सन्मान,
महाशक्ती ही एकच अशी
तिच्यामुळे होई प्रगत ज्ञान... ३.
जाते तुडवत वादळवाट
रडत नाही बसत संकटात,
कितीही दु:खे आली तरी
घेते कवेत आसमंत... ४.
