STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Inspirational

3  

Manisha Wandhare

Abstract Inspirational

सुखाची झोप

सुखाची झोप

1 min
193

निवांत पडली रात आता,

सुखाची झोप शांत बाता,

पहूडला प्राजक्त अगंणात ,

सुगंध दरवळला श्वासात...

निवांत पडली रात ,

सुखाची जणू बरसात,

मनाचे समाधान खरे,

हिच मिळकत आयुष्यात...

अत्तरापरी कर्म पसरले,

आता ना मागे परतले,

श्वासांना क्षण उसंत लाभले,

सुखाच्या झोपेत स्वप्न पडले...

आयुष्याच्या एकांती ,

मनाला लाभली शांती,

आता नाही कुठली शर्यत,

अखेर पैज जिंकली अंती ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract