सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुख म्हणजे नक्की काय असतं?
पहाट होताच पक्ष्यांच्या किलबिलाटाने मग्न होऊन जाणं म्हणजे सुख असतं
काटेरी वाट असलेल्या
आयुष्यात कोणीतरी
गालीच्या बनून येण
म्हणजे सुख असतं
दुःखाच्या दरीत कोसळले असता कोणीतरी आपल्याला आनंदाच्या महासागरात घेवून जाण
म्हणजे सुख असतं
कधी एखाद्यासाठी झिजण तर
कधी पहिल्या पावसात भिजण म्हणजे सुख असतं
कधी यशासाठी लागलेला ध्यास
तर कधी एखाद्यावर निस्वार्थ विश्वास म्हणजे सुख असतं
प्राजक्ताच धरेवर समर्पित होण
ओघळतांना आसमंताला परीमळ
करण म्हणजे सुख असतं
मनात न मावणार भावनांचा आभाळ जेव्हा अश्रूच्या रूपाने वाहू लागतं तेव्हा रित झालेल मनाच अंगण सुखाच्या स्वरांनी गाऊ लागत ते म्हणजे सुख असतं
नाजूक क्षण विरहाचे
अंतरंगी असतांना
कोणीतरी येण्याची चाहूल देत आणि गारवा देणार्या त्या भासानेही एकाकीपण आयुष्याच सार संपत ते म्हणजे सुख असतं
मनातील शब्द सुमन, स्पंदन कागदावर अधोरेखित होण
चंद्राच्या शीतलतेत ताऱ्यांच लुकलुकण अन् ते मंत्रमुग्ध होऊन पाहणं म्हणजे सुख असतं
कळ्या फुलांच्या सौंदर्यात स्वताला न्हाऊ घालणं
म्हणजे सुख असतं
आईच्या डोळ्यातील आपल्यासाठी असलेलं अप्रूप
वडिलांनी केलेल कौतुक
आयुष्यभरासाठी मिळालेली कुटुंबाची साथ आणि डोक्यावर मायेचा हात म्हणजे सुख असतं
कोणाच सुख कशात तर कोणाचं कोणात
सुखाची वेगवेगळी कल्पना प्रत्येकाच्या मनात
या जगात व्यक्ती तितक्या असतात प्रकृती
प्रत्येकाची सुखाकडे पाहण्याची वेगळी वृत्ती
शेवटी ज्याला ज्यात सुख वाटत तसे त्याने मानाव
आपल्या सुखासाठी कधी
ना कुणाला दुखवाव
अपेक्षे बाहेर असलेल्या
गोष्टींची इच्छा न
बाळगता आहे त्यातच समाधान बाळगाव..
