सुख कशाला म्हणतात...
सुख कशाला म्हणतात...
सुख कशाला म्हणतात...
पश्चात्ताप मरताना
म्हणे जन्म वाया गेला.,
सुख कशाला म्हणतात
कोणी सांगाल का मला...
लागला पैशाच्या मागे माणूस
भाऊ भावाचा वैरी झाला...
या पैशासाठी माणूस
जीव देतोय घेतोय
पैशासाठी तयार कोणी देह विक्रीला...
लबाडी, लुटमार
सारं चाले पैशासाठी ,
धन लोभाने माणूस
कसा हैवान झाला...
संधीसाधू, भोंदू
लुटून जगाला,
अरब पती, करोडपती
जसा आला तसा गेला...
नाही कळले कुणाला
जीवनाचे सार्थक ,
दिनरात राबणारा
इथे उपाशीच मेला...
नाही दया, माया कुणा
नाही उपकाराची जाण,
नातीगोती खोटी सारी
विसरती आईबापाला...
स्वार्थापोटी माणूस
कसा होई हैवान,
शोधू कुठे आता
माणूस, माणुसकीला...
गायकवाड आर.जी.दापकेकर.
9834298315
