सुख - दुःख
सुख - दुःख
सुख पाहे जवापाडे
दुःख पर्वताएवढे
चव सुखाची कळता
दुःख अचानक पुढे
सुखापायी हुरळतो
घेतो जीवन आनंद
नसे कुणाचीही पर्वा
आपुल्याच नादे दंग
सर्व सुखाचे साथी
दुःख येताच सोडती
येते खरे समजूनी
मग पारख जाणती
खरे उमजती बंध
दुःखाच्याच छायेमधी
हात हातात गुंफुनी
धरी छत्र डोक्यावरी
देवा सावली तुझीच
लाभो सुखदुःखामधी
सुख दुःख सम मानी
तोच यशस्वी जीवनी
