सुगरणीचा खोपा
सुगरणीचा खोपा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
खोप्यामध्ये खोपा
सुगरणीचा खोपा...१...
हिंडते रानोमाळ
फिरते चोहीदिशा...२...
लागली चाहूल
ऐन पाऊसाची...३...
लागली चिंता
घरटे बांधायाची...४...
करी गवत गोळा
पिंजूनिया खोपा...५...
जसा बांधला बंगला
पिंजूनीया खोपा...६...
खोपा टांगला झाडाला
पिलं झुलती खोप्यात...७...
असा बांधला खोपा
काडी माडी विणून...८...
अशी केली कलाकृती
मानवाला लाजविले
...९...
विणीते चोचीने
एक न एक काडी...१०...
अशी डिझाईन
खोपा टुमदार झाला...११...
न कुठला प्लान न
कुठला आर्किटेक्ट...१२...
सुगरणीच्या हुशारीनं
माणूस हारला माणूस हारला...१३...
अरे खोप्यामध्ये खोपा
सुगरणीचा खोपा...१४...
खोपा झाडाले टांगला
जीव झाडाले टांगला...१५...
पिलं झुलती खोप्यात
जशी झुलता मनोरा...१६...
खोप्यामध्ये खोपा
सुगरणीचा खोपा...१७...