सुडाचा प्रवास
सुडाचा प्रवास
आयुष्याच झाड निष्पर्ण होतं होतं उजाड होत चाललय
ऋतू संपून गेलेत वसंत गेला आता शिशीराची चाहूल लागलीय
कधीतरी पक्षांचा चिवचिवाट
निळ्या आभाळाचा गजबजाट मोहक वाटायचा
पण आता ...
तो चिवचिवाट नकोसा वाटतो
मागं कधीतरी झालेली सल पुन्हा बोचायला लागतेय
संवेदना जाणीवपूर्वक आठवण करून देतायत येणाऱ्या शिशीराची
हळव्या जखमा पुन्हा पुन्हा स्मरणात येतायत
मनातल मन शोधत ह्रदयापर्यत जाऊन आलो
तेही तिथूनही पळवाट काढत कुठस गायब झालं ते समजलंच नाही
अन् पुन्हा एकदा ...
भन्नाट एकाकी पणातून तुझी जिवंत प्रतिमा
दूरवर कुठंतरी निघून गेलीय
आणि आता परत सुरू झालाय
आठवणीच्या सुडाचा एकाकी प्रवास
मौनांचा आकांत सुरू झालाय
मीरेची वाळवंटातली पाठमोरी प्रतिमा
मनाला खोलवर कुठंतरी काचायला लागलीय
शिशीरांची चाहूल कुजबुजायला लागलीय