स्त्रीत्व
स्त्रीत्व
येऊ दे लाख अडथळे
होऊ दे अत्याचाराच्या शर्यती
गिळून घे पदोपदी होणारा अपमान
गोंदवून घे हृदयावर तुझी स्रीजात
पण मांडू नकोस बाजार स्वतः चा
विकू नकोस स्वाभिमान माणूस होण्याचा
बळी पडू नकोस तुच्छ आमिशांना
विद्रुप करू नकोस स्त्रीत्वाला
भुरळ पडेल सोनेरी सळ्याचीं
पण सावध रहा कदाचित त्या
लालबुंद गरम सळाकी असतील
विवंचनेचं जोखड बाजूला सारून
खोच पदर कमरेला आणि सज्ज
हो इथल्या कुजकट , विषमतावादी व्यवस्थेला गिळंकृत करण्यासाठी
पिऊन टाक तो विषाचा पेला आणि
कर तांडव तेजस्वी होऊन दाखव
सभ्य समाजाचा विकृत चेहरा
जपू नकोस तळहातावरील फोडांना
नको घेऊस पदरात सहस्त्र अजगरांना
वाचा फोड आणि कर दोन दोन हात
वाहण्याऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला
करतील दिशाभूल तुझीही
पण लक्षात ठेव नाकातोंडात पाणी
जाऊ देऊ नकोस
विद्रोह तुला करावाच लागेल
राजबिंडामधलं घबाड ओळखावचं लागेल
सहन कर तेवढंच, जेवढं झेपतं तुला
उगाच रडुबाई बनून जगू नकोस
कुढण्याचे संस्कार मोडीत काढ आतातरी
पाशवी अत्याचाराच्या मुसक्या बांधून धिंड काढ भर बाजारात
फेकून दे दिव्यतेच्या त्यागाचे पांघरूण
वाघाणीच्या दुधाचे प्राशन करून कर तू गुरगुर
कुणाचीही होण्याचा छळ संपव आता
दुसऱ्याची होण्याआधी हो स्वतः ची
मिळतो तुलाही एकदाच जन्म
आहे तुला ही जगण्याचा अधिकार
घे हिसकावून जगण्याचा हक्क
संघर्ष तुला करावाच लागेल
माणसाचे जीवन जगण्याचा