STORYMIRROR

Nalanda Wankhede

Tragedy

4  

Nalanda Wankhede

Tragedy

स्त्रीभ्रूण हत्या

स्त्रीभ्रूण हत्या

1 min
565


स्त्रीभ्रूण गर्भात आहे पुण्याईची पावती

नका संपवु हो तिला माउली दोन्हीघरची


ती असली की घर दुडू दुडू धावतय

ती नसली की घर खायला उठतय


वर्दळीने तिच्या वाहतो मंदझरा

नका खुडू कळी चिमुकल्या सोनपाखरा


मुलगी नसेल तर सुन कोठुन आनणार

नवजीवनाचा सोहळा साजरा कसा करणार


वंशाचा दिवा असतो मुलगा समज आहे खोटा

कुठे कमी पड़ते मुलगी समजावून मला सांगा


दोन चाकाचं रहाटगाडग एका चाकाने कसे चालणार

समजा मुलीला गर्भातच जर तुम्ही संपवनार


आई ती माई ती प्रेयसी ती बहिण ती

अर्धांगनी ती, मान ती सन्मान ती


तिच्याशिवाय घरपन नाही हो घराला

कशाला करता हत्या मग चिमणीच्या घरट्याला


मुलगी ही कुटुंबाचे आनंदाचे उगमस्थान

ज्या घरी आहे मुलगी ते आहे तीर्थस्थान


ती नाजुक अल्हड सोशिक प्रेमळ वात्सल्याची करुणामयी मूर्ति

गर्भातच नका हो ठार मारू विनंती करतो तुमची


जितकी अवहेलना कराल तेवढीच नाळ तिची मजबुत होते

पुरुषार्थी अभिमानाला सुरुंग ती लावतेय


कुटुंबाची धुरा सांभाळते समर्थ खांद्यावर

गाजवुन सर्वक्षेत्र साठवुन वेदना उरावर


संसाराचा पसारा रणगाडा चालवते

समर्थ शिक्षित स्त्री देशाची बदलते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy