STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Tragedy

4  

Sangeeta GodboleJoshi

Tragedy

स्त्रीभृणाचे मनोगत

स्त्रीभृणाचे मनोगत

1 min
371

खुडलेली मी एक कळी जी 

कधी न आली जन्माला

का नच पडला ओरखडाही 

खुडणाऱ्यांच्या हृदयाला


स्त्रीभृणहत्या पाप असे

पण कुणीच मज ना वाचविले 

पहायचे जग होते मजला 

होते मनी मी योजियले


स्त्री म्हणूनी जन्माला येणे

गुन्हा असे का जगती या

अस्तित्व कसे राहिल जगताचे

करुनि सदा स्त्रीभृणहत्या


आई लागते जन्म द्यावया

 बहीण लागते ओवाळाया

अर्धांगिनी संसार कराया 

का मग उदरी 'नकोच' तनया


काय असे मी केला कुठला

 गतजन्मी अतिघोर गुन्हा

अनुत्तरीत हे प्रश्न जोवरी

होऊन 'स्त्री'जन्मेन पुन्हा 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy