स्त्री - तू प्रेरणा
स्त्री - तू प्रेरणा
विविध रुपात
घडवी जीवना
शक्ती रुपात
स्त्री -तू प्रेरणा ...
संस्कार देते
विचार देते
माणूस घडण्या
स्त्री - तू प्रेरणा ....
राजाला घडवी
पराक्रमी -थोर
पुरुष बनवण्यास
स्त्री - तू प्रेरणा ...!
माता , भगिनी ,
सखी , प्रेयसी ,
पत्नी रूपातली
स्त्री -तू प्रेरणा ...!
साथ ,सोबत तुझी
जीवन वाटचालीत
अर्थपूर्ण जगण्याची
स्त्री - तू प्रेरणा ...!