STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

स्त्री मन...

स्त्री मन...

1 min
7

उगाच हसते उगाच रडते ,

कधी कुणावर उगाच चिडते ,

खरचं उगाच असते का? ते ,

एका स्त्रीचे मन उगाच नसते ते ...

कधी फुलपाखरू बागडणारे,

वाऱ्यावरती गिरक्या घेणारे ,

फुलाच्या मोहात अडकुन ,

पंख स्वतःचे स्वतः छाटणारे ...

कधी नदी उफानलेली ,

खळखळ वाहते निर्झरा ,

अवचित कुणी घेतली ओंजळीत,

सार्थ होतो त्याचा जन्म खरा...

विराट आहे तिची ओळख ,

स्त्री म्हणुनी आली सोबत,

मन तिचे हळवे अलगद,

दवबिंदू कमळाच्या पानात...

उगाच हसते उगाच रडते ,

कधी कुणावर उगाच चिडते ,

खरचं उगाच असते का? ते ,

एका स्त्रीचे मन उगाच नसते ते ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract