STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Inspirational

4  

RohiniNalage Pawar

Inspirational

'स्त्री' एक शिल्पकार

'स्त्री' एक शिल्पकार

1 min
379

ती एक मुलगी आणि 

एक बायको असते,

ती एक बहीण असते नि

एक 'आई' असते...||१||


नऊ रूपे साकारणारी

ती एक दुर्गा असते,

दृष्टाला नुसत्या रागीट नजरेने

भस्म करणारी ती एक 'आग' असते...||२||


स्वतःबरोबर इतरांना घडवणारी

ती एक शिक्षिका असते,

आपल्याला घडवणारी पहिली गुरू

ती 'स्त्री' एक आई असते...||३||


निराधाराला आधार देणारी

ती एक काठी असते,

दुःखाच्या झळाया झेलून

सुख बहरणारी ती एक 'सावली' असते...||४||


मातीच्या गोळ्यांना शिल्पे बनवणारी

ती एक कलाकार असते,

'स्त्री' एक शिल्पकार असते

'स्त्री' एक शिल्पकार असते...||५||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational