STORYMIRROR

Poonam Kulkarni

Inspirational

3  

Poonam Kulkarni

Inspirational

स्त्री एक भाग्यलक्ष्मी

स्त्री एक भाग्यलक्ष्मी

1 min
222

तव आरास राजाची पाहुनी,

कीव सर्वज्ञा येई..

साम्राज्याची भरभराट असे,

पण तेज फिकट होई..


साम्राज्ञी ती निखळ मनोहर,

हास्य तिचे शोभे सुंदर..

चंद्रही होई उदास पाहुनी,

अशी ती मनमोहिनी..


तिची ती भाबडी आशा,

राजास रुचली नाही..

त्याच्या विश्वाची भयावह कल्पना,

तिला पचली नाही...


राजांनी मग वेगळे राज्य मांडले,

हातच्या रेषांचे नशीब बदलले...


राज्यात तो कधी तिच्या फिरकलाच नाही,

त्याच्याच राज्याचा पसारा त्याला उरकलाच नाही...


मग एके दिवशी राजाशी वाटे जुन्या राणीची फिरकी घ्यावी,

माझ्या वैभवाची राणीस प्रचिती द्यावी...


बोलावुनिया प्रधानासी विचारपूस राणीची केली,

गुर्मी राजाची पाहुनी प्रधानाची मान खाली गेली...


प्रधानसाहेब कुठं आहेत तुमच्या मानलेल्या माताराणी,

मिश्कील हसू करत विचारीतसे राजा आणि पट्टराणी...


आमच्या वैभवाची वार्ता त्यांच्याकडे कळवत जा,

प्रशंसा करुनी हृदय तयांचे जळवत जा...


प्रधान उत्तरसी मनास धीर देऊनी,

माफ करा राजा ऐका माझे गर्व बाजूस ठेवूनि


सम्राज्ञी माझी न राही उत्तरा नाही पश्चिमा,

ती राही आपल्याच तळाशी तिची वेगळीच गरीमा


पाया तुमचा भक्कम म्हणुनी तुमचे राज्य टिकले,

तुम्ही मात्र तुमच्याच भाग्यलक्ष्मीला लाथाडीले..


जळवीता काय हृदय तयांचे ज्यांनी जीवन तुम्हा तिधले,

विश्वसल्या त्या बंधनासी ज्यांनी त्यांचेच हात बांधले...


फुटके तुम्ही राजा त्या तुमच्यापेक्षा असे धनवंत,

पाया जिचा लक्ष्मीचा तोच खरा भाग्यवंत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational