स्त्री-देवी
स्त्री-देवी
(एका मुलीचा आई दुर्गा देवी शी चाललेला हा संवाद...)
आई दुर्गादेवी आज वाजत गाजत झाले तुझे आगमन...
मी देखिल केले तुला मनोभावे वंदन...
पुरूष कार्यकर्त आनंदाने करतात तुझी नित्य सेवा...
नऊ दिवस का होईना,पण मला वाटतो ह्याचा हेवा...
ऐवढी होते तुझी भक्ती असुनही तुझे स्त्री रूप...
हे पाहून मला पडले आहेत प्रश्न खुप....
आज विचारू का ग तुला?
मिळतील का उत्तरे मला?
का मिळाला मला हा स्त्री जन्म??
असे काय होते माझे पाप- पुण्य कर्म?
प्रत्येक रुपात सगळे करतात तुझी भक्ती
आणि स्त्रिंयाना मात्र प्रत्येक गोष्टीत असते सक्ती..
स्त्री असूनही तू महिशासुराचा केला वध,
आम्हा मुलींना येता जाता रहावे लागते सावध...
दानवांना मारून तु देवांचे केले रक्षण,
इथे तर स्त्रीला स्त्री कडून ही नाही मिळत संरक्षण..
अष्टमीला करतात कुमारी मुलींचे पूजन...
तरी का ग होते भृण हत्या आणि लिंग परिक्षण...
तु तर पापी लोकांचा करते संहार,
तरी का होतो आहे इथे, स्त्रियांवर अत्याचार?
तुझ्या शस्त्रांनी तु अन्यायी लोकांना देते शिक्षा,
इथे स्त्रीचीच घेतात अन्यायानंतर अग्निपरीक्षा..
नऊ दिवस तुला खास पंच पक्वान्नाचा नैवेद्य,
पण मुलींला मात्र कुठे मिळते इथे पौष्टिक खाद्य?...
दिसते तु छान, जेव्हा करतात तुझा साज श्रृंगार,
आम्हा मुलींनी मात्र कुठे आहे नटायचा अधिकार??
तुझ्या तिथे नाही ग होत असा भेदभाव...
होते इच्छा की,
तुझ्याबरोबर मी ही घ्यावी तिथे धाव...
जय अंबे,