स्त्री-भृणहत्या
स्त्री-भृणहत्या
मारु नको रे, नको रे मारू
कोवळ्या कळीला प्रेमाणे स्विकारू
हवा वंशाला दिवा, नको धरू असा ध्यास
विचार कर जरा
जर नसेल वात, तर कसा पडेल
दिव्याचा प्रकाश…
ताईची माया, कोण देईल दादाला
नसेल बहीण तर
कोण बांधेल राखी रक्षाबंधनाला
ओवाळणी साठी मग कोण रुसेल भाऊबीजेला
लेक जणु रुप सरस्वती
छुमछुमणारे पैंजण तिचे, शोभा असे घराची
घराचे होईल वृंदावन
जर घरात नांदतील पाऊले लक्ष्मीची
प्राजक्ताचा सडा जेव्हा दारी पडेल
कोवळ्या हातांनी अलगद ती वेचेल
रंगीबीरंगी रांगोळीने अंगण सजेल
हसऱ्या तिच्या डोळ्यांमध्ये स्वर्ग नवा भासेल
कमी नको समजु तिला
शिकुण सवरुण होईल मोठी
मुलाच्या खांद्याला लावील खांदा
का करतोस काळजी लग्न आणि हुंड्याची
आठव ते हालअपेष्ठांच म्हातारपण
दमलेल्या जिवाला अनाथाश्रमच घर
काय उपयोग मग वंशाच्या दिव्याचा
जर उतारवयात आधार तुला, लेकीच्याच हळव्या शब्दांचा
सोड तुझा हट्ट आता
राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, जिजाऊ, कल्पणा चावला
घेऊ आदर्श या रणरागीणींचा
अन् थांबऊ स्त्री-भृणहत्या…
