आपला दिस
आपला दिस
धडाड-कडाडते नभ,
गेलं काळवंडून आकाश.
अधुन-मधुन कवातरं,
दाखवी विजबाई परकास...
दिसामाजी रात झाली,
चल जाऊ सजणी घराकडं,
बघ ती पाखरं बी,
निघाली घरट्याकडं..
ति बघ धरणी ,
निघाली न्हाऊन,
पसरला तिच्यावर ,
पांढरा थर (गारा)...
'धनी बघावं बघावं'
समदी किती सुखात,
ती वनराई बी,
बघा डुलती आनंदात...
आपुल्याच नशीबात,
कश्याबाई ह्ये वनवास,
बाजरी बी बघा, गेली पावसात,
अन् गव्हाचा बी आता लागला कसं...
'असुदे गं सजणी'
जातील हे बी दिस,
येईल बघ एकदिशी,
ती पण पहाट...
जसा धरणीवरं पडला,
विजांचा लखलखाट ,
तसाच एकदिशी ...
असलं आपुला दिस...
बघं..
असलं आपुला दिस...
