होळी
होळी
नास्तिक राजा हिरण्यकश्यपू
द्वेश त्याला देवाचा
पुत्र प्रल्हाद असा लाभला
लळा ज्याला विष्णु भक्तीचा..१
दृष्ट पिता तो हिरण्यकश्यपू
उठे जिव्हारी प्रल्हादाच्या
असुरी बहीण त्याची होलीका
गर्व तिला अमर वरदानाचा..२
वरदानाच्याच आवेशात होलिकेने
अग्नीचा खेळ रचला
मंत्रवस्त्र पांघरलेली होलिका अन्
मांडीवरती बाळ प्रल्हाद बसला…३
अयोग्य वापर वरदानाचा
होलिकेस नाही लाभला
विष्णु भक्त प्रल्हाद बाळ
अग्नीतही सुखरुप राहीला…
फाल्गुन मास पौर्णिमेला
हुताशनी चा अंत झाला
वाईट कृत्यांचे होऊन दहन
सत्कर्मांनी विजय मिळवला…५
होलिका दहनाची ऐकुन कथा
सत्कर्मांची भिक्षा घ्यावी
दुर्गुणांची सोडून साथ
राग, क्रोध, द्वेष, अहिंसेची होळी पेटवावी..६
