सांग ना बाबा
सांग ना बाबा
सांग ना बाबा..
काय काय करतोस तु??
आनंदी राहावे घरातील सगळे..
म्हणून ..
किती किती कष्ट करतोस तु…
प्रत्येकाची ईच्छा पूर्ण करण्यासाठी..
तुझ्या किती ईच्छा मनातच ठेवतोस तु..
डोंगर भले जबाबदारीचे ..
कसे कसे उचलतोस तु …
सांग ना बाबा..
काय काय करतोस तु??
डोळ्यांत आलंच कधी पाणी..
तर पापण्यांआड दडवतोस तु..
नियतीचे खेळ रोज नवे..
कसं रे जिंकतोस तु..
सांग ना बाबा..
काय काय करतोस तु..??
दुखलं-खुपलं काही ..
तरीही न सांगता सहन करतोस तु..
एवढं सगळं करताना ..
सांग ना बाबा..
किती रे दमतोस तु..??
तुटुन जातात आशा सारख्या..
उरतात नुसती स्वप्न..
जगासमोर हसताना..
आतुन किती तुटतोस तु..??
सांग ना बाबा..
कसं रे सावरतोय तु??
सांग ना बाबा..
लेकरांसाठी तुझ्या..
कसं परिस्थितीशी लढतोस तु..
आयुष्याच्या रंगमंचावर अनेक येतात संकट..
निर्भिडपणे सगळं कसं रे निभावतोस तु ??
सांग ना रे बाबा...
काय काय करतोस तु..??
