गळफास
गळफास
पाणी नाही पिकाला,
अन्न नाही खायला,
उपाय नाही जगायला,
म्हणून घेतोस तू गळफास…
पोराच्या शिक्षणाला,
पोरीच्या लग्नाला,
दमडी नाही खर्चायला,
म्हणून घेतोस तू गळफास…
गोड-धोड नाही सनाला,
साडी-बांगडी नाही बायकोला,
कसं अन् काय सांगु पोरांना,
म्हणून घेतोस तू गळफास…
मदत मागीतली सरकारला,
तिथुनही हुलकावणी मिळाली तुला,
बळ नाही उरलं लढायला,
म्हणून घेतोस तू गळफास…
भाव नाही पिकाला,
घोर लागलाय जिवाला,
दोष देऊन नशिबाला,
टांगतोस तू स्वतःला…
