STORYMIRROR

Poonam Jadhav

Others

2  

Poonam Jadhav

Others

वारी पंढरीची

वारी पंढरीची

1 min
41

ज्ञानोबा तुकारामांच्या / तल्लीन जयघोषात //

वारकर्यांची वारी / ‌‌ विठुरायाच्या दर्शनास //


झिम्मा,फुगडी खेळ / टाळ मृदुंगाचा गजर //

अवघ्या वारकर्यांची नजर / पंढरीच्या वाटेवर 


आतुरली पाऊले /माऊलींच्या भेटीस //

मुखी हरिनाम /विठुरायाचे स्मरण रात्रंदिस //


 वृंदावन डोईवर /तुळशी माळा गळाभर //

भोळ्या भक्तांच्या भक्तीस / श्रद्धेचं बळ //


चंद्रभागेत स्नान / वैकुंठाला नमन //

पुंडलिक वरदा हरी कृष्ण /जप मुखामुखांत //


पाहुनी विठ्ठलास / भक्तजन सुखात //

पांडुरंगाच्या पायी / दु:ख निराशेचा नाश //


पंढरीची वारी / हरिदर्शनाची आस //

नांदते पंढरी /वारकऱ्यांच्या मनामनांत //

 वारकर्यांच्या मनामनांत //


Rate this content
Log in