STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

*ससुला अन कासव.....*

*ससुला अन कासव.....*

1 min
26.4K




ससुला चालला फिरायला

सोबत घेतले कासवाला....


चढू लागले डोंगरावर

कासव घसरे उतरावर.....


ससूला चढे हो भरभर

कासव प्रयत्न करी लवकर....


ससूला कासवाची पाही वाट

कासवाचा काही निराळाच थाट..


ससूला वाट पाहून थकला

जोरात धावून तोच दमला....


मधेच ससूला थांबला

झाडाच्या सावलीत झोपला..


कासव आले हळूहळू

पाही ससूला झोपाळू....


कासवाने वेग वाढवला

डोंगरावर तो पोहोचला....,


ससूला जागा झाला

कासवाला पाहू लागला....


भरभर उड्या मारत गेला

डोंगर माथा त्याने गाठला....


समोर पाहिले कासवाला

दोष दिला स्वतःच्या झोपाळू पणाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational