STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

षट्कोळी

षट्कोळी

1 min
27.6K


षट्कोळी

वृक्षांची जंगले तोडली

मानवाची करनी महान 

उगारले शस्त्र बिनधास्त

म्हणुनच पावूसदादा दडले

जावुन आभाळी लपले

सृष्टी झालीया अस्वस्थ १) 

संस्काराचे सुविचार मनी

भरून देवूया ज्ञानमोती

निरक्षरांना साक्षर करूया.

सर्वांगिण विकास करून

देशाच्या कार्याला हातभार

लावून करूया कर्तव्य .२) 

फक्त तीच यावी

माझ्या या जीवनात

भटकत राहिन दाहीदिशा.

जोपर्यंत मिळत नाही

राहिन तिला शोधीतच

तोपर्यंत होईना निराशा .3)

तुझ्या सोबत असताना 

वात्सल्याचा भाव मनी

भासतया आसमंत जवळ

आल्हाद भरतोया ह्रदयात

झरतोया उन्हाळ्यात झरा

त्यात फुलतोया कमळ.4) 

विस्मृती हा रोग आहे

त्याला वाढवू नये आपण

त्वरीत दवाखाण्यात जावून.

औषधोपचार करूनीया

दूर करावा हा जटील रोग 

व मिळवावे सुख समाधान.५) 

नटलेली अशी विविधरूपे

माय मराठीच्या वारकऱ्यांची

उंचावूनी भाषेचा मानसन्मान

वीरयोद्धे बळीराजाचे धैर्यदार

संस्कार संस्कृतिचे गावूनी 

समृद्ध करूया स्वाभिमान.६) 

रंगपंचमी खेळूया एकवटून

जातपात विसरूया होळीत

सप्तरगांत जागवू सतकर्म

क्षण आनंदाचे भोगून

पाणी बचत करुनीया

मनसोक्त निभावूया धर्म७) 

आकांक्षेला पंख असून

उडवे आपना आकाशात

विचारपूर्वक निर्णय घेवून..

समर्थपणे भरारी घेण्या

करूया सुद्न्य सतकार्य

जवाबदारी मनी उचलून..८)

व्याभिचाराची व्याख्या निराळी

पावलोपावली दिसते आहे

मनाच्या किल्मिशतेला आव्हान.

प्रथमतहा निर्मळ व्हावे

नंतर जगातील बघून

व्हावेत स्वत: विद्वान..९) 

मन्मनात रंगाची बरसात

दिमाखात या वसली आहे

सालाबाद प्रमाणे सदाही..

मैफल भरूवूया सप्तरंगाची

खेळूया आता पाण्याविणा

रसात्मकता असावी यंदाही.१०).

सुखसमृद्धीच्या मागे मागे

जीवाचेया रान करूनी

करतोय आपण धावपळ..

अंतसमयी काही नसतेय

जवळ आपल्या तरीही

करतोच आहे जमावळ.. ११)  

तुझी यशोगाथा वर्णावी

शतकोटी नतमस्तक आम्ही

उपकार तुझे अनंतजन्म

मानतात ब्रम्हादिक ज्ञानी

सदैव गातसे स्त्रीगान 

ऋणी धरतीचा कणकण .१२)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational