STORYMIRROR

Seema Kulkarni

Inspirational Others

4  

Seema Kulkarni

Inspirational Others

**सशक्त भारत**

**सशक्त भारत**

1 min
596

सशक्त भारत घडवू या 

भविष्य उज्वल देशाचे 

मनोबल तरुणाईचे

नवयुगाच्या क्रांतीचे. १.


बदललेली दिनचर्या

सोशल मीडिया सवयीचा 

साथीने ध्यानधारणेच्या 

मुकाबला संकटाचा. २.


योगसाधना जरुरीची

 बळकट शरीरयष्टीला 

सुंदर आकार देहाला 

चित्तवृत्ती फुलण्याला. ३.


श्वासाचा व्यायाम घडे 

प्राणायाम अंगीकारता

प्रतिकारशक्ती बळावूनी 

वेळेची उपयोगिता ४.


पिझ्झा-बर्गर दूर लोटू

सेवन सकस आहाराचे 

नेटाने करू दहन 

पाश्चिमात्य संस्कृतीचे. ५.


आसनाने लवचिकता 

रोगाची चिंता नसे 

क्षमतेची वृद्धि होई

आत्मविश्वासाची हमी असे. ६.


योगसामर्थ्ये शक्तीची 

वाच्यता न फुकाची 

बलदंड भारतमातेला 

महानता संस्कृतीची. ७.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational