सरण थकलंय काय मरण पाहुनी !
सरण थकलंय काय मरण पाहुनी !
सरण थकलंय काय मरण पाहुनी !
हा निसर्गाचा रुद्रावतार की मरणाची अगतिकता
शरीरही रुसले की संपली त्याची प्रतिकारत्मकता
का एवढी घाई संपविण्यास आपली जीवनयात्रा
कि खरंच लागू पडत नाही कोणत्याच ओषधांची मात्रा ?
नातेवाइकांचा टाहो नाही की कोणाची वाट पाहणे नाही
फुलांची तिरडी नाही कि राम नाम सत्य नाही
अंगणात शेवटच्या अंघोळीचा देखील नाही घाट
फक्त सरणाची आणि प्रेताची भेट हाच शेवटचा थाट.
हॉस्पिटल ते स्मशानभूमी नाही मध्ये कोणताही विसावा
मरणालाही लाज वाटावी, प्रेतालाही जागा मिळेना अंतिम वारीला
चेहऱ्यासहीत झाकलेल्या शरीरावर नाही मंत्र-उच्चार
की धर्म, कुळ, जातीचा नाही कोणताही सोपस्कार.
चहुबाजूनी उभे फक्त प्लास्टिक किट घातलेले आरोग्य कमर्चारी
प्रत्येक बॉडीला फेकतात बिनधास्त रिकाम्या सरणावरी.
कोणी रक्ताचे नाहीत मुखाग्नी देण्यास त्या चितेला
सर्व अंत्यभूमीत दिसतोय चारी बाजुंनी वणवा पेटलेला .
ओळखू येईना कोणाच्या हस्त्या कोणत्या सरणात
राख मात्र सारखीच, पण कोडं नाही उलगडत.
असंच चित्र प्रत्येक शहरात आणि गावोगावी
का कोण जाणे त्या ईश्वरालाही लाज वाटावी !
हे आता रोजच बघतोय आणि ऐकतोय
रात्रीच्या झोपेतही चितेचा वणवा दिसतोय.
खरंच सरणही थकलंय काय मरण पाहुनी
कशी थांबवणार आहोत आपण ही जीवितहानी ?
