STORYMIRROR

savita Dhakne

Thriller

2  

savita Dhakne

Thriller

सरली ती रात्र

सरली ती रात्र

1 min
15.4K


अमावस्येची होती रात,

अन चुकली माझी गाडी,

काळाकुट्ट पडला अंधार,

अन घनदाट होती झाडी.


सोबतीला नव्हते कुणीच,

एकटीच लागले चालू,

घनदाट जंगलात असती,

वाघ, लांडगे अन् भालू.


जराशी सरली वाट अन्,

कानी पडली डरकाळी,

धस्स झाले पोटात माझ्या,

माझ्यासाठी ती रात्र काळी.


अचानक झुडपा आडून,

खडखड आवाज आला,

खूपच घाबरुन पाहीले तर,

समोर वाघ उभा ठाकला.


भयानक वाघ पाहून,

झाले मी घामाघूम,

काय करावे तेच कळेना,

मग जोरात ठोकली धूम.


पळताना पाहून मला,

वाघाने मारली झडप,

अंधारात धावत जाऊन,

झुडपात झाले मी गडप.


निसटून वाघाच्या तावडीतून,

झाडाझुडपात बसले दडून,

सावज निसटल्याने वाघाने,

फोडली डरकाळी खडबडून.


घाबरुन झाले गर्भगळीत,

ह्रदयाची धडधड होईना शांत,

डोळ्यासमोर दिसले मरण,

वाटे आला जीवनाचा अंत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller