स्रीजन्म
स्रीजन्म
आई मलाही जगात येऊ दे
बाहेरचे जग मलाही पहायचे
माझ्या बहीणीची माया मला घेऊ दे
मी तुझाच अंश, तुझाच हिस्सा
तुझ्यातून तर माझी उत्पत्ती
तूच करशील माझी हत्या
अशी कशी गं नियती
आई मला दुनियेत यायचे
तुझ्या ममतेत मला न्हायचे
तुझे अश्रु मला पुसायचे
मी नाही कलंक,मी नाही बट्टा
मी तर तुझ्या परसातली फुलराणी
मलाही बागेत उमलायचे
बाहेरचे जग मलाही पहायचे...
