स्री
स्री
ऐका ही स्री जातीची कहाणी,
कोणीही करावी तिथे मनमानी.
स्री म्हणजे साधन उपभोगाचे,
फक्त चूल आणि मूल यांचे.
काम तिचे रांधा वाढा उष्टी काढा,
ती म्हणजे डोक्याला पीडा.
मर्दानी लढली झाशीची राणी,
देश चालविला इंदिरा गांधींनी.
कल्पना चावला उडाली आकाशी,
तरीही का असते ती नकोशी.
होता जमाना असा कधीतरी,
बदलली आता दुनियादारी.
घरातून बाहेर ती पडू लागली,
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावू लागली.
घरकामातून तिने सुटका केली,
साऱ्याच क्षेत्रात बाजी मारून गेली.
नका देऊ आव्हान तिच्या कर्तुत्वाला,
गरज तीचीच या साऱ्या जगाला.
ती शिकली घरादाराची प्रगती झाली,
दारावर ती च्या नावाची पाटी आली.
