सर पावसाची आली
सर पावसाची आली
वेळ सायंकाळची अशी
मंद वायुने शिरशिरी आली
ढगांनी आदळत गडगडाटां नी
वीज चमकू लागली ।।१।।
पर्जन्य धारा कोसळत
सुवास मातीचा आला
पायी चालत जात असता
अंग भिजुन ओलाचिंब झाला ।।२।।
न्हवते मजकडे रेनकोट
न्हवती हाती छत्री
पहिल्या पावसाची हजेरी
मनोमनी झाली खात्री ।।३।।
पहिल्या च पावसात
केली सगळी दैना
नाले भरून वाहू लागले
बोचरी हवा अंगी मानवेना ।।४।।
पाऊस आला वारा आला
सागावा देत मना
पहिल्या पावसाची सर
उल्हासित करत आठवांच्या जिवना ।।५।।
विजेचा लखलखाट
ढगांचा गडगडाट
करू स्वागत पर्जन्याचे
गीत गुणगुणत त्याचे ।।६।।
पक्षी आकाशी किलबिल
मंजुळ स्वर कानी
पहात नभात ढगांची गर्दी
सर पावसाची मनी ।।७।।
