सप्तरंगांची चाहूल घेऊन
सप्तरंगांची चाहूल घेऊन
आज तू अगदी इंद्रधनू बनून आलीस
त्या ऊन-पावसाच्या खेळात
अन् तुझे मृगजळासारखे
अस्तित्व निर्माण करून गेलीस
ते इंद्रधनू घेऊन आले होते
'तुझ्या अस्तित्वाचे सप्तरंग',
सप्तरंग पाहिले
अन् मला वाटले तूच आलीस
इस्ततः नजर फिरवली पण तू काही दिसली नाहीस
दिसले ते फक्त 'सप्तरंग'
तुझी चाहूल निर्माण करणारे
आकाशात तुझं सौंदर्य वर्णनारे
काल सुद्धा स्वप्नात माझ्या
अलगद आली होतीस
मला न सांगताच
हळूवार निघून गेली होतीस
आजही तू असेच केलेस का?
त्याचे उत्तर शोधतोय
पण त्याचे उत्तर कधीच मिळत नाही
मिळवायचेय मला ते
तुला लवकरच पत्र पाठवतो
देशील का उत्तर?
तू तर निरूत्तर होऊन
उत्तरच धाडत नाहीस
पण यावेळेला एक मात्र नक्की सांग
काल स्वप्नात,
आज त्या ऊन-पावसाच्या खेळात
'इंद्रधनू' बनून तूच आली होतीस ना
'सप्तरंगांची' चाहूल घेऊन?

