Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

4.6  

Sarika Jinturkar

Abstract

स्पर्श

स्पर्श

1 min
303


 


नुकत्याच जन्मलेल्या बाळाला उराशी बिलगलेल्या त्या चिमुकल्या ओठांचा घट्ट मिठीत आपल्यालाच कवेत घेण्याचा स्पर्श वासल्याचा ममतेच्या जाणिवेचा  

निस्वार्थ प्रेमाचा विनामूल्य मायेचा 

स्पर्श तो सुखाचा स्पर्श प्रेमाचा  


आईला तान्हुलेल्या बाळाच्या स्पर्शाने होते गहिवर 

हळूवार बिलगते बाळ 

स्पर्श त्याचा होतो जेव्हा गालावर आई बाळ दोघेही किती सुखावती पूर्णत्वाची हीच तर पोचपावती☺️  


हळूच मोहरून जातो हळूवार स्पर्श मायेचा

 होते मन अधीर आठवतो जेव्हा पदर आईचा

 अजूनही आहे अंतरात भरलेला गंध जाईचा

ओढ कशी वासराला हंबरडा चाले जेव्हा गाईचा  


स्पर्श बोलतो तेव्हा शब्द अबोल होतात अंतरीची भावना नकळतपणे सांगून जातात 

 माया ममता प्रेम सारे स्पर्श एकच सुखाचा

 फिरता हात पाठीवरती सरतो लवलेश दुःखाचा  

आपुलकीचं, जिव्हाळ्याच कोणी भेटलं की बंध

 मनाचे खुलू लागतात 

शब्दांची गरज भासत नाही स्पर्श सारे बोलून जातात 


आठवणी ही असतात मोर पिसारयाचा हळुवार स्पर्श 

नकळत मनाला होणारा हर्ष 

 

तिन्ही सांज ही अवघडतात 

विरहाच्या क्षितिजावर निःशब्द होतात अवचितच येतो थवा अनाम पक्ष्यांचा 

भानावर येते जेव्हा स्पर्श होतो रजनीचा

स्पर्श शब्दांचा वर्षाव जणू सुगंधी रातराणीचा 

कठीण प्रसंगात कुटुंबाला आधार स्पर्श तो ममतेच्या शब्दांचा


 स्पर्श कुठल्यातरी कारणास्तव प्रथमच हात मिळविण्याचा तर कधी चुकून अथवा जाणून-बुजून स्पर्श झाल्याचा 

एखाद्या भेटीत प्रथम हातात हात मिळवत चालण्याचा 

आयुष्यभर साथ देईन म्हणून दिलेल्या सात्वंनाचा 


दिवसभराच्या सर्व कामानंतर एकत्र एका विसाव्यात बसल्याचा 

कुटुंब सांभाळताना क्षणिक दुःखाचा, अमर्याद आनंदाचा


नुकत्याच सुरकुत्या पडत चाललेल्या त्या बदलांचा सावरण्यासाठी हातात पडलेल्या आधाराचा

 शेवट फक्त उरलेल्या बंद आठवणींचा आणि

 ज्योत मावळून गेलेल्या त्या देहाचा 

असा.... स्पर्श ...


 एखादी घडलेली घटना, गोष्ट 

एखादी कविता, काव्य, एखादा लेख, कथा...  

कसं.... कधीतरी मनाला स्पर्शून जातात...  

 अंतरीचे भाव नकळत पणे आपल्याला सांगून जातात ....

 स्पर्शाची ही भाषा निराळी 

 स्पर्श वाटतो तेव्हाच सुखाचा, प्रेमाचा, फिरतो हात जेव्हा पाठीवर वात्सल्यरूपी  ममतेचा..😊🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract