STORYMIRROR

Suvarna Patukale

Inspirational

3  

Suvarna Patukale

Inspirational

स्फुतीँ

स्फुतीँ

1 min
235

त्या शूरांनी त्या वीरांनी

सांगितला जो मंत्र खरा

तो आचरूनीया सार्‍यांनी

संकटावरी मात करा.,हो मात करा

हा देश पराधीन झाला

अन् गुलाम झाली जनता

एकेक क्रांतिवीर उठला

दिली लाथाडून ती सत्ता

तो मार्ग तुम्हीही धरा तो मार्ग तुम्हीही धरा

ही आपली एक परीक्षा

ना हतबल होऊन चाले

धीर एकवटूनी सारे

चल पुसूया डोळे ओले

या अश्रूंना आवरा या अश्रूंना आवरा

मग दाखवू या दुनियेला

ही एकजुटीची शक्ती

अन् हरवू या शत्रूला

काढून काही युक्ती

हा निश्चय पहिला करा हा निश्चय पहिला करा

त्या शूरांनी त्या वीरांनी

सांगितला जो मंत्र खरा 

तो आचरूनीया सार्‍यांनी

संकटावरी मात करा.,हो मात करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational