सोनेरी संध्याकाळ
सोनेरी संध्याकाळ
अंगावर चढवले गरम कपड्याचे एकावर एक थर
एकमेकांचे हात हातात घेऊन उंडारलो दिवस भर!
सेल्फिच्या जमान्यात भान नव्हते अवताल भवतालचे
गुरफटलो होतो एकमेकांच्या भावना नीट ओळखयास!
सोनेरी संध्याकाळ दिसत होती समोर
रंगीबेरंगी अवकाश खुलवत होते आमचे भावविश्व!
ठरवले होते आधी सिनेमा बघू
पण सोनेरी संध्याकाळने मन वळवले!
फिरत राहिलो ते रंगिबेरंगी सोनेरी क्षण अनुभवण्यास
पांघरून आकाश सारे!
घेतल्या आणा भाका साक्षीला ठेवुन ती सोनेरी संध्याकाळ
अशीच असेल आपली हातात हात घेतलेली आयुष्याची सोनेरी संध्याकाळ!
हातात हात घेतलेली सोनेरी संध्याकाळ!!!
