STORYMIRROR

komal Dagade.

Children

3  

komal Dagade.

Children

सोनेरी क्षण बालपण...

सोनेरी क्षण बालपण...

1 min
223

   "काय होतें ते दिवस,

किती सुंदर रम्य तें बालपण,

 शिळ्या भाकरीतही वाटे श्रीमंतीपण 

 खेळ होतें जुने,पण त्यात रमायचो फार 

   स्वतःला हरवून बसायचो सगळे,

एका वेगळ्याच दुनियेत,

 मन होतें मोठे, त्यावर जखमा होत्या कमी,

ते होतें एक निरागस विश्व्,

 जेथे कुतूहल फार,

लाखो प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर,विविध प्रश्नात,

नव्हते कसले जबाबदारीचे ओझे,

ना कसली टेन्शनची भीती,

मन होतें मोठे, त्यात दडलेले होतें प्रेम 

अनमोल वाटे ते सोनेरी क्षण

मनातील छोटेसे फुलपाखरू,

भिरभिर करत उडायचे स्वछंदी

कल्पनांच्या विश्वात रमायचे,

जीवनातील मजा घेयचे,

ना कसला कोणावर रुसवा, ना कसला फुगवा,

निरागस मनात होतें फक्त निर्मळ विचार,

भूतकाळात डोकवताना,

 पाहिले मी मागे,

निरागसपणा संपला होता,

या आभासी दुनियेत जगताना,

खोटा मुखवटा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children