सोहळा
सोहळा
आला श्रावण, श्रावण,
घेऊन सोहळ्याचे सण
एकमेकांस गळाभेटीचा क्षण
हर्षोल्लासाची घेऊन खाण
सोहळा या देशाचा,
आहे की हो शान
विविध रंगाने नटलेला,
ज्याला त्याला त्याच्या सणांचा अभिमान
सोहळा प्रत्येक जाती धर्माचा
मान ठेवून देशाचा
जन जागृत करण्याचा
मार्ग देशाच्या प्रगतीचा
सोहळा नटण्याचा,
साजशृंगार करण्याचा
संस्कृतीच्या जागरणाचा,
पुढच्या पिढीला जाण ठेवण्याचा
सोहळा मनाचा,
तिमिर दूर जाळण्याचा
देशाच्या संरक्षणासाठी,
लढणाऱ्या त्या वीरांचा
सोहळा वारकऱ्यांचा,
गुरू-शिष्यांच्या भेटीचा
ज्ञान वाटण्याचा,
काव्य संमेलन करण्याचा
