STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

सोहळा वर्षेचा

सोहळा वर्षेचा

1 min
57

भास्करतेजे अवनी पोळे

रत्नाकरही तप्त उसळे

नभाकडे धरती विनवे

जलदाने जलदान द्यावे (1)


आर्जव धरेचे परिसूनी

नभा व्यापिले घनमालांनी

वेगाने मृगधारा झरती

तृषार्त धरती शांतविती  (2)


घन घन मेघांचे गर्जन

संतत धारांची उधळण

अनंत हस्ते वर्षति धारा

तृप्त जाहला निसर्ग सारा (3)


जलवर्षावे लता डोलती

झुलत सुखाने तृणपाती

धरेवरी हिरवाई साजे

इंद्रधनूचा गोफ विराजे  (4)


जलधारांचे थांबे नर्तन

खग डोकावे कोटरातून

भिरभिरती जल प्राशूनी

झेपावती ते गगनांगणी (5)


ऋतुमागुनी ऋतु सरती

सृष्टीमाते सुखावून जाती

कालचक्र हे असेच चाले

निसर्गराजा तथास्तु बोले (6)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract