STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

संत नामदेव महाराज

संत नामदेव महाराज

1 min
211

वारकरी संप्रदायाचे प्रचारक

संत नामदेव महाराज थोर

नामवेदाचे, नामविद्येचे प्रणेते

किर्तन कलेत फार हुशार ||


'भागवत धर्माचा 'प्रसाद

पंजाबापर्यंत पोहोचविला

श्री विठ्ठलांचा असे सखा

'संत शिरोमणी 'संबोधन केला ||


केली हिंदी भाषेत रचना

६५ पदांचा समावेश करत

गुरुग्रंथसाहेब असे महान

'भगत नामदेव' शिख म्हणत||


ज्ञानदेव,नामदेव भेटीतून

विचार प्रवाह उदयाला आला

कीर्तनातून व अभंगातून

ज्ञान-भक्तीचा संगम झाला ||


सर्व सुख माझे पांडुरंगी मिळे

अशी नामदेवांची धारणा करू

समाज जागृती करण्यासाठी

अध्यात्मिक कार्य होते सुरू||


दुःखा पासुनी मिळावी मुक्ती

सुख ,शांती, समाधानाला अर्थ

नामस्मरणाचा सोपा मार्ग

विश्वकल्याणाची प्रार्थना सार्थ ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational