संस्कृती
संस्कृती
झुंजूमुंजू पहाट,
कोंबडयाची बांग,
आली वासुदेवाची साद
दाराशी सङा रांगोळी,
विठ्ठलाच्या सेवेमध्ये
आली वारकरी मंङळी
कधी लावणीची बाजी,
तर कधी काठी न् घोंगङ घेऊन धनगर हाजीर,
पाचीपक्वान्नाचा इथं भरतो मेळा,
प्रत्येक सण मोठा,
नाही आनंदा तोटा,
संतांची पुण्यनगरी,
इथ रेङयाने म्हटली ज्ञानेश्वरी,
तुकोबाचे अभंग, नामदेवांचे वचन, गाङगेबाबांचे शासन,
शिवरायांचं आठवाव रुप,
म्हणूनच सांगतो,
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा
अभिमान वाटतो खूप
