संस्कृती नि जीवनशैली...
संस्कृती नि जीवनशैली...
भारतीय संस्कृतीप्रमाणे मांडी घालून
प्रेमळ सहभोजन असायचे दररोजचे
आता भोजन टेबलावर तांत्रिक घास
अनारोग्य हातात संगती मोबाईलचे
आधी देवापुढे नित्यनियमाने व्हायचे
सगळेच लहान नि मोठे नतमस्तक
कुठे, कधी आभासी जीवनशैलीसाठी
आधुनिक पिढी होतेय कुटुंब भक्षक
म्हणायचे विवाह हा आयुष्यातला
सर्वात सुंदर पर्व जीवन संस्कारांचा
पण आज हव्यासासाठी खेळ चाले
तरुणांचा एकमेकां शारीरिक भंगाचा
आयुर्वेदात म्हणे सकाळची शुद्ध हवा
आरोग्यासाठी एकमेव अनमोल औषध
घरोघरी उशिरा उठण्यातच मिळतो
बघायला जीवन जगण्याचा नवा शोध
एकत्रित सुखी कुटुंबाच्या वारशाची
झाली आहे एकलकोंडी अवस्था
भंगलेल्या फक्त फॅशनेबल राहण्यात
मुळीच उरली नाही प्रेमाची आस्था