STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

संस्कार

संस्कार

1 min
226

सरस्वतीच्या ज्ञानमंदिरात

ज्ञानसागरातील सागरात

कितीही पोहावे म्हटले तरी

फक्त गुडघाभरच भिजाल ज्ञानात....

ज्ञानसागरातील ज्ञानबिंदू

मुलांच्या बुद्धित भरावेत

लहानपणीच मुलांवर हे

संस्कारातून जोपासावेत...

बोधकथा सांगूनी मुलांना

सुसंस्कार त्यांना देवू

मूल्यशिक्षणाचे धडे देवूनी

उत्तम नागरिक घडवू.....

साठवू बुद्धीपात्रात ज्ञानबिंदू

ह्रयात प्रेमभावना जागवू

भारताचे भविष्य उत्तम बनवू

भारताची शान जगात वाढवू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational