STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Others

संसाराची वाट

संसाराची वाट

1 min
781

अणवाणी पायी वाट चालते माय

डोही संसाराचा भार 

कडे वरती लेकरू घेवूनी वाट चालते माय

वाटेत खाच खळगे

पोटी दु:खाचे चटके

तळ पाया येती फोड

संसारासाठी वाट काढते माय ।

अणवाणी पायी वाट चालते माय

वाटेत रूतता काटा

वंश संसाराचा काढितो वाटा

अणवाणी पायी वाट चालते माय

संसाराचे भोग सोसित माय काढते वाट

वाट सरता सरेना संसाराची दुःखे सोसता आयुष्य

 पूरता पूरेना

अणवाणी पायी वाट चालते माय

डोयी संसाराचा भार वाट वाटते भविष्याची आस

मनी भूतकाळाची कास कधी संपेल आयुष्याची वाट 

अणवाणी पायी वाट चालते माय

मुला बाळा घेवून चढते दुःखाचा डोंगर शोधी सुखाची वाट 

कधी संपलं या बाईपणा ची वाट 

अणवाणी पायी वाट चालते माय

संसारा पायी आटते रंगत टोचता वाटेत दुखाःचे काटे 

तेव्हां सांडते रंगत नयनी पाणी पुसत वाट चालते माय

अणवाणी पायी वाट चालते माय

पोरा बाळा साठी अंधारातून प्रकाशाकडे वाट काढीते माय

भविष्य त्यांचे वाटी येईल सुखाची पहाट

अणवाणी पायी वाट चालते माय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract