संपलो नाही
संपलो नाही


कापले जरी दोर माझे
चढेन उद्या नव्याने,
रोखले कित्येकदा मला
परि कधी रडलो नाही...
माझे शरीर वेधण्याचे
प्रयत्न किती कटाचे
थेंब थेंब वाचवूनी
पोटात मावलो नाही...
डोळ्यांत अंधारी जरी
वाटेत कित्येक वादळे
अडथळे असून भारी
पैशात तोललो नाही...
थांबलो असेन आज मी
पण मी संपलो नाही...
पेटेन पुन्हा एकदा,
पुरता अजून विझलो नाही...