सण संक्रांतीचा
सण संक्रांतीचा
सण आला संक्रांतीचा,
दुःख सारुन बाजूला,
सुखाची पखरण करण्याला,
टाळून कटुता, जपण्या नात्याला!
सण आला संक्रांतीचा !!
प्रवेशता रवि मकरराशीत,
होई संक्रमण कूकर्मांचे,
वारसा जपू संस्काराचा,
तिलांजली देऊ असभ्यतेला,
सण आला संक्रांतीचा !!
खमंग तीळाची जोड गुळाला,
दाणे,डाळ, खोबरे साथीला,
पाकात घालून लाडू वळला,
तिळगुळ घ्या गोड बोला,
सण आला संक्रांतीचा !!
किंक्रांतीला केला शेंगसोला,
खमंग तीळाची जोड भाकरीला,
पुरण पोळीची लज्जत भारी,
पतंग भिडवू आभाळाला,
सण आला संक्रांतीचा !!
पहिल्या वहिल्या सणाला,
संस्कृती, सदाचार जपुया,
दानधर्माची जोड देऊन,
वारसा जपू मानवतेचा,
सण आला संक्रांतीचा !!
