STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

सण प्रकाशाचा

सण प्रकाशाचा

1 min
391

आली दिवाळी तिच्या स्वागता

सजले अमुचे घर आणि अंगण , 

पसरला चहूबाजू तिच्या आगमनाचा सुगंध

जणू दरवळते चंदन !

आकाश कंदील दारी सजला

सजल्या दाही दिशा पणत्या , 

घेऊनी आली नवचैतन्य

ही दिवाळी वर्णन करू मुखे कोणत्या ?

अंगणी शोभे मनमोहक

ती रंगावली अंगी लेवूनी नाना रंग , 

घरादाराची करिता सजावट

मोहरुन उठे अमुचे अंग प्रत्यांग ! 

दीन असो वा लखपती ,

सान असो वा थोर ,

दिवाळी साऱ्यांची एकसमान , 

येता पर्व हे प्रकाशाचे

ज्याच्या त्याच्या आनंदाला येई उधाण !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics