सण दिवाळीचा...
सण दिवाळीचा...




आला आला दिवाळीचा सण
देवा तुला एवढं मांगणं आहे
आनंदाने करू दे दिवाळी
एवढेच आता सांगणं आहे.
गरिबांच्या आयुष्यात सदा
श्रीमंतीचे असे सुंदर क्षण दे
श्रीमंतांना उदारता अन्
माणूसकी चे मोठेपण दे.
सगळ्यांनाच सुख समृद्धी
सुदृढ शरीर आरोग्य दे
गरज पुर्ण व्हावी एवढं
सर्वांच्या घरी धनधान्य दे.
एकमेकांच्या कामी येतील
असे ते मदतीचे हात दे
कुणीही नको दुःखी असावं
असा हा दिवाळीचा सण दे.
एवढेच तुला मागने हे
पुर्ण करावी आमची आस
नाही करणार तू निराश
आहे असा हा पक्का विश्वास.