STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

सण बैलपोला-संजय रघुनाथ सोनवणे

सण बैलपोला-संजय रघुनाथ सोनवणे

1 min
1.0K




सण वर्षाचा आला बैलपोळा

एक दिन आनंद मिळतो बैलाला

शेतकरी राजांचा,अति बहुमानाचा

सण आला ग्रामीण भागाचा


संवगडी राबणाऱ्या शेतकरी राजांचा

ज्यांनी दिला बहुमान बैलाला

एक दिवस का होईना ,राखून ठेवला

सजवून त्याला गावभर मिरविला


नित्य नेमाने परत शेतात राबतो

उन, वारा, पाऊस सारा अंगावर झेलतो

दुःख, यातना बळी राजासाठी पचविले

कुटुंबासाठी त्याने सारे आयुष्य वेचले


निःस्वार्थ सेवा त्याची फक्त जगासाठी

त्याचा जन्म फक्त कायम कष्टासाठी

वर्षभर देह तो मातीत झिजवितो

कठीण कष्टाने पीक शेतात उभारतो


इमान सोपवितो सारे त्याच्या मालकावरी

चाऱ्या पाण्याचे उपकार विश्वासाची चाकरी

कष्टातून त्याच्या साकारले देवपण

सुखी केले त्याने सारे मानवी जन


शेवटही त्याचा मातीतच होतो

परमार्थ मुक्या प्राण्यातून दिसतो

निस्वार्थ सेवा, प्रेम, माया त्यांनी शिकविली

संतांची शिकवण प्राण्यांनी सुद्धा जपली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational